Tuesday, 1 November 2011

तुला वाढवताना ...



घेउनिया पंख चिमुकले
मज पोटी आलास तू
तुझ्या वाटेकडे डोळे लावले मग
विसरुनी  माझे जग

तुझ्या आवडी मला भावे
तुझ्या नावाडी मला नावडे
असे पाहता पाहता लागले
राहून राहून मला डोहाळे

तुझ्या मूर्तीची कल्पना
पुन्हा पुन्हा केली ध्यानी
तुझा साठी एव्हढी  ममता
वाटे का माझ्याच मनी

दिवस भर्ता लागली कळ
सोसेना मझ्या जीवाला हि झळ
नामस्मरण करता तुकाचे
पहाट झाली तुझ्या दर्शनी

धरुनी तुझी चिमुकली काया
अंतर्मनी माझ्या आली ती माया
म्हणता म्हणता झाली अशी
मी इवल्युश्या बाळाची जननी

दिवस जाता वाटू लागे
असीम आनंद नभात ना फावे
कुठे दडली होती हि 'आई'
तुझा जन्म होण्या आधी?

रात्रीची ती जागरणे
लांगोत्तीचे ते धुणे
करता करता विसरले
माझ्याच पुरते जगणे

छोट्या पावलाने पहिले पाउल टाकलेस
तुझ्या पडण्याच्या भीतीने ठोके मझे चुकले
ओठातून मग तुझ्या काहीतरी पुत्पुत्लास
'आई' कानी पडताच जीव माझा सुखावला

आता तू मोठा झालास
तुझ्या स्वभावाला रूप आले
हट्ट हि मग सुरूच झाले
घरच्यांनी हि प्रेमाने ते पुरवले
अश्यावेळी आईचे मन
झाले मात्र कठोर पण
तुला शिस्त लावणे
आहे आता माझ्याच माथे

तुझे चुकीचे वागणे
जरी तुला न कळे
तुज्या वरती हाथ उगारताना
काळीज माझेच हादरे

घरातल्यांचे धिक्कार
तुझ्या डोळ्यातले अश्रू चार
ठीज्जून टाकतात माझे हृदय पार
माझ्यातल्या  'आईचा'
 येतो मग मलाच राग


हा माझा अटाहास
कुणा न कळे जरी आज
तुला वळण लावल्यानेच
घडेल तुझा कणा ताठ

जगाची हि रीतच जणू
दिसतात सुंदर मातीचे घडू
पण घडवताना त्यांना
माखतात मात्र कुम्भाराचेच हात

एके दिवशी तूला  होईल न्याती
वाढवशील जेह्वा माझ्या  नाती
हसता खेळता व्हावे लागते
आपुल्यालाही कणखर मनाचे

तुला वाढवताना एकच इच्छा असते  ध्यानी
तुझीच सभ्यता दिसो  जनी
तुझे गुण-गान इतिहासाच्या पानी
मग विसरू दे भले कुणी हि तुझी जननी

तुला वाढवताना...



5 comments:

  1. woww..mastach.. dole bharun aale agadi..

    ReplyDelete
  2. khupach chaan lihili aahes hi kavita!! majhi aai pan nehami hech mhanat aste! :) will definitely share it with her too! :)

    ReplyDelete
  3. wow - great:) do spread it more via approaching marathi newspapers. it is a very good piece -- :) u have the gift of writing -- spread it :)

    ReplyDelete