झ्हुकुझ्हुकू झ्हुकूझ्हुकू अगीनगाडी
घेऊन चालली माझ्या ध्यानी
छोट्याश्या सुंदर गावी
पळती वर्षे पाहूया
आठवणींच्या गावी जाउया
गावात या दडली आजी
विळीवर बसून चिरते भाजी
लाडात पुन्हा वाद्धुया
आठवणींच्या गावी जाउया
आंब्याच्या रसाची
फणसाच्या वासाची
काजूच्या सोलण्याची
आजोळच्या घराची
सहल आपण काढूया
आठवणींच्या गावी जाउया
बागेतल्या फुलांचा
पहिल्या पहिल्या पौसाचा
गंध पुन्हा घेऊया
आठवणींच्या गावी जाउया
शाळेत जायची गडबड ती
गृहपाठाची परवड ती
बाईंची खोड काढूया
आठवणींच्या गावी जाउया
मैत्रिणीच्या हाकेला
पळत जाताना खेळायला
गप्पांची गट्टी जमवुया
आठवणींच्या गावी जाउया
दिवा लागता देवापाशी
शुभम करोति येता ओठी
परवचे पुन्हा आठवूया
आठवणींच्या गावी जाउया
परीक्षेच्या काळात मग
पुस्तकात बुडालेले आपले जग
लांबूनच पाहूया
आठवणींच्या गावी जाउया
दिवाळीची फुलबाजी
आईच्या हातची ती चकली
लाडू मजेत खाऊया
आठवणींच्या गावी जाउया
सुट्टीच्या नाताल्यात
काका मामा येई घरात
रात्री सगळ्या जागवूया
आठवणींच्या गावी जाउया
वाढत्या त्या वयाची
तोकडे होणार्या कपड्यांची
दखल एकदा घेऊया
आठवणींच्या गावी जाउया
बाबांच्या धाकाच्या
आईच्या मायेच्या
घरट्यात गाढ झ्होपुया
आठवणींच्या गावी जाउया
आठवणींच्या गावी जाउया....
घेऊन चालली माझ्या ध्यानी
छोट्याश्या सुंदर गावी
पळती वर्षे पाहूया
आठवणींच्या गावी जाउया
गावात या दडली आजी
विळीवर बसून चिरते भाजी
लाडात पुन्हा वाद्धुया
आठवणींच्या गावी जाउया
आंब्याच्या रसाची
फणसाच्या वासाची
काजूच्या सोलण्याची
आजोळच्या घराची
सहल आपण काढूया
आठवणींच्या गावी जाउया
बागेतल्या फुलांचा
पहिल्या पहिल्या पौसाचा
गंध पुन्हा घेऊया
आठवणींच्या गावी जाउया
शाळेत जायची गडबड ती
गृहपाठाची परवड ती
बाईंची खोड काढूया
आठवणींच्या गावी जाउया
मैत्रिणीच्या हाकेला
पळत जाताना खेळायला
गप्पांची गट्टी जमवुया
आठवणींच्या गावी जाउया
दिवा लागता देवापाशी
शुभम करोति येता ओठी
परवचे पुन्हा आठवूया
आठवणींच्या गावी जाउया
परीक्षेच्या काळात मग
पुस्तकात बुडालेले आपले जग
लांबूनच पाहूया
आठवणींच्या गावी जाउया
दिवाळीची फुलबाजी
आईच्या हातची ती चकली
लाडू मजेत खाऊया
आठवणींच्या गावी जाउया
सुट्टीच्या नाताल्यात
काका मामा येई घरात
रात्री सगळ्या जागवूया
आठवणींच्या गावी जाउया
वाढत्या त्या वयाची
तोकडे होणार्या कपड्यांची
दखल एकदा घेऊया
आठवणींच्या गावी जाउया
बाबांच्या धाकाच्या
आईच्या मायेच्या
घरट्यात गाढ झ्होपुया
आठवणींच्या गावी जाउया
आठवणींच्या गावी जाउया....

That's a really nice one. Brings back a lot of memories! Lovely post
ReplyDelete